माझ्या मनातील पहिले शब्दरंग
माझ्या मनातील पहिले शब्दरंग
वाटेल मनाला तुझ्या,तु सर्व कर
प्रेम मात्र माझ्यावरचं,कमी नको तु करु
जाऊया ना तरून,दोघंही सोबत,
संसाराच्या या प्रवाहात,एवढंस पुण्य
तु करशील ना?
तूच माझी सकाळ अन् तूच सायंकाळ,
होत असते रोजच,घेऊन तुझच नावll१ll
जर करतील कुणी,दूर दोघांना
तर सांगशील का त्यांना,
'शीर' सोबत आमचं उडवानाll२ll
मी तर सर्व,आंनंद माझा,
दिला आहे करून सर्व,नावावर तुझ्याll३ll
झाले जेव्हां प्रेम,आपले घोषित,
हरलोय चिंता आता,तु माझ्या कुशीतll४ll
लोकांची करडी नजर,आपल्या प्रेमावर
विरोध त्यांचा तू रोखशील ना?ll५ll
वाटेल मनाला तुझ्या, तू सर्व कर
प्रेम मात्र माझ्यावरचं,कमी नको तू करु
जाऊया ना तरून, दोघंही सोबत,
संसाराच्या या प्रवाहात,एवढंस पुण्य
तू करशील ना..?

