STORYMIRROR

THOMBARE HAUSHIRAM BAJIRAO. @ (Hansraj)

Romance Inspirational

3  

THOMBARE HAUSHIRAM BAJIRAO. @ (Hansraj)

Romance Inspirational

सांग ना जरा !

सांग ना जरा !

1 min
204

-एवढी प्रिती कर की, 

मी बुडून जाईल कुठेतरी...

परत किनाऱ्यावर भेटशील ना,

मी हरवुन जाईल कुठेतरी..!

-पाहिले असता प्रिये तुला,

मी तर अजून झोपलो नाही...

सांग ना जरा...

हृदयात काय लपवलंय,

मी कुणाला सांगणार नाही..!

- एकट्याला झोप नाही येत आता,

स्वप्नांत माझ्या येत जा ना...

चालू शकत नाही, तुझ्याविना आता,

माझी तु आता, काठी बन ना..!

- शेवटी एकच, तुझ्यावरच प्रिती करील...

बाकी मी, काहीच नाही...

सांग ना जरा...

हृदयात काय लपवलंय,

मी कुणाला सांगणार नाही..!

- कमतरता भासेल, माझी तुला...

भिजवेल जेव्हां, पावसाळा तूला...

मी भरवून आणीन, डोळ्यात माझ्या, 

राहीलेली स्वप्ने काही...

अन् अंत:करणाशी एकरूप झालेले प्रियकर,

गप्पा शरीराच्या करत नाही..!

सांग ना जरा...

हृदयात काय लपवलंय,

मी कुणाला सांगणार नाही..!

खरचं,,, कुणाला सांगणार नाही !!!


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Romance