Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

THOMBARE HAUSHIRAM BAJIRAO. @ (Hansraj)

Romance

4  

THOMBARE HAUSHIRAM BAJIRAO. @ (Hansraj)

Romance

"शब्द..., रेशमांचे..!"

"शब्द..., रेशमांचे..!"

1 min
523


"वाट असो वळणांची...,

दोन्ही बाजूंनी पर्णांची...,

दिवस कितीही दूर गेला... तरी,

सोबत असो माझ्या "रेशीम शब्दांची"...!"


- मी प्रश्न आहे...,

तु उत्तर आहेस...l१l


- मी गणिताचे सूत्र...,

तु भुमितीचे, प्रमेय आहेस...l२l


- मी मार्ग शांतीचा...,

तु दिशा, क्रांतीची आहेस...l३l


- मी परम सत्याचा पूर्व...,

तु मावळती, पश्चिम आहेस...l४l


- मी कठोर अग्निचा सूर्य...,

तु शांतीचा, चंद्र आहेस...l५l


- मी दिवस आशेचा...,

तु प्रहर, अपेक्षांचा आहेस...l६l


- मी मधुर सावलीचं झाड...,

तु खोलवर मजबूत, त्याची मुळं आहेस...l७l


- मी अक्षांश गोलार्धातील...,

तु रेखांश, त्यातील आहेस...l८l


- मी छत प्रत्येकाचं...,

तु छताची कवाडं आहेस...l९l


- मी ऊंच-ऊंच क्षितीजवरती विसावलेलं आकाश आहे...

तु धावणारी त्यामधील झुळूक आहेस...l१०l


- मी भूतलावरील माती...,

तु नेसुन शालु हिरवा, 

त्यात सामावुन मला घेतले आहेस...l११l


- मी पेटणारा अग्नि...,

तु तयास विझवणरं पाणी आहेस...l१२l


- मी अर्धा तुझा, अन्...

तु माझी अर्धांग आहेस...,

मिळून दोघं एकच आहेत...,

मिळून दोघं एकच आहेत...l१३l


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance