Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

THOMBARE HAUSHIRAM BAJIRAO. @ (Hansraj)

Inspirational

3  

THOMBARE HAUSHIRAM BAJIRAO. @ (Hansraj)

Inspirational

चातकापरि वाट पाहे... माझी माय..!

चातकापरि वाट पाहे... माझी माय..!

1 min
339


- माझ्या मायेनं सतत घराला आनंदी ठेवलं,

मला रुपयांची गरज भासली तर

चोरुन हजार दिलं...,

- कशा देशात कसं राहत असेल,

माझं लेकरू...,

असं ती माझ्याबद्दल विचारत असते,

माझ्या जोडीदारांना..!

- भाकर खाल्ली का?

माझी माय इचारते,

किती पगार कमावतो,

बाकी सारे इचारता...ll१ll

- खबर विचारता मी घराची,

 सांगते हसून...,

पण मला माहीत आहे- ती रडत असेल,

रात्र- बेरात्र जागून...ll२ll

- कोणत्या देशात नि मुलुखात, असेल माझं लेकरू,

झोयतय का नाही...,

विचारणा करते चांदण्यांना...,

अंगणात फिरुन-फिरुन...ll३ll

- भाकर खाल्ली का?

माझी माय इचारते...,

किती पगार कमावतो,

बाकी सारे इचारता...ll४ll

- सारेजण इचारता, मला काय आणशील- माला काय आणशील...

माझी माय इचारते...,

"बाळा..!"

घरी कधी येशील...ll५ll

- एक माझ्या "माय" नि "बा" ची,

माला आहे काळजी, राहील मी जोवर...,

बाकी फक्त क्षणभर, नि बोलतात वरवर...ll६ll

- भाकर खाल्ली का?

माझी माय इचारते...,

किती पगार कमावतो, बाकी सारे इचारता...

किती पगार कमावतो, बाकी सारे इचारता...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational