माझंच चुकलं
माझंच चुकलं
डोळ्यांत पाणी दाटत नाही,
तसं काही वाटत नाही,
सवय झाली आहे तुझ्या आरोपांची,
आणि भावना ही बोथट झाल्यात,
माझंच चुकलं तेव्हा खरचं,
फुलं समजून,
निखारे पदरी बांधून घेतले,
जेव्हा मी तुझ्या प्रेमाला,
नकळत कबूल करून घेतले...

