प्रेमातल्या भांडणावर
प्रेमातल्या भांडणावर
माझ्या प्रेमातल्या खोट्या भांडणावर,
जेव्हा तुझ्या डोळ्यांतून पाणी येते,
तेव्हा तुझ्या प्रेमाची,
खरी प्रचिती मला येते,
तुला रडताना पाहून,
काळजाची या घालमेल होते,
खरंच कुणी कुणावर एवढं प्रेम,
कसं बरं करु शकते,
सहज माझ्या बोलांनी ही,
टपटप असवं तुझी गळतात,
एवढं प्रेम नको गं करू माझ्यावर,
माझ्या पश्चात तुझं असं होईल,
या विचारानेच माझे अवयव,
थरथरायला लागतात...

