माझी लक्ष्मी
माझी लक्ष्मी
सर्व जग तिला म्हणे गाय
आम्ही म्हणू तिला लक्ष्मी माय
शेतातून बाबा येता घरी
चाहूल लागते तिला दारी
आनंदाने जोरात फोळते हुंबरडा भारी
माय माझी माय लक्ष्मी गाय....|| ध्रु||
सर्व जग तिला म्हणे गाय
आम्ही म्हणू तिला लक्ष्मी माय
पहिले पाऊल टाकले तिने दारी
सर्व दुःख दारिद्य्र पळून गेलं बाहेरी
रूपाचे तिचे काय वर्णन करू
दिसे जणू हरणाचे लेकरू
माय माझी माय लक्ष्मी गाय....||१||
सर्व जग तिला म्हणे गाय
आम्ही म्हणू तिला लक्ष्मी माय
दुधात तिच्या अमृताची गोळी
रोगराई ला पळवून लावी दारी
शिंग तिचे दिसे खूपच सुंदर
जणू दिसे चंद्राची अर्धी कोर
माय माझी माय लक्ष्मी गाय....||२||
सर्व जग तिला म्हणे गाय...
आम्ही म्हणू तिला लक्ष्मी माय
तिच्या मध्ये देव बसली तेहत्तीस कोटी
हनुमान जी दिसे माझ्या लक्ष्मीच्या शेपटीत
शेणामध्ये दिसे लक्ष्मी माता
आणखी काय सांगू तिची गाथा
माय माझी माय लक्ष्मी गाय....||३||...
सर्व जग तिला म्हणे गाय...
आम्ही म्हणू तिला लक्ष्मी माय
आवाज तिला देता माझ्याकडे बघते
टकलावून तिचे कान टवकारून
आता ती पूर्ण म्हातारी झाली
पण सौंदर्यात नाही कसली कमतरता आली
माय माझी माय लक्ष्मी गाय....||4||