STORYMIRROR

Vasudha Naik

Inspirational

4  

Vasudha Naik

Inspirational

माझी लेखणी

माझी लेखणी

1 min
178

कविता माझी अक्षरधनाची

भावनांनी सुरेख गुंफलेली

माझी लेखणी लिहिती झाली

अक्षरधनाने कविता रंगलेली.....


रेखाटलेय त्यात माझे मन

माझे जीवन गुपीत सार

सुंदर विचारांनी सजवला मी

अक्षरधनांचा मस्त हो हार.....


माझे जीवन हो रंगमहाल

चारोळी,लेख अन कवितांचा

लपवले अक्षरधन रंगमहालात

पूर आला अर्थपूर्ण भावनांचा...


माझी जीवनगाथा मांडली

खजिना कवितांचा साठवला

सिनेमा जीवनाचा अहो मी

शब्दमहालात की हो सजवला....


वही माझी अक्षरधनाची छान

फारच हो जपून ठेवलीय

चाहूल लागता तुमची की हो

मी वही समोर आणलीय....


काय येणार हो आपल्या बरोबर

माझे अक्षरधन सर्वांच्या मनात राहतील

मी जगात नसताना पण हो

लोकं माझी आठवण तरी काढतील....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational