माझी आई
माझी आई
जगता-जगता जो मरतो तो बाप असतो,
मरूनही जीवंत राहते ती आई असते॥१॥
आला जोरात पाऊस आई मुलांना छत्री देते,
स्वत: त्या पावसात भिजत असते ॥२॥
जगन ज्याला कळत नाही तो खड्यात पडतो,
त्या बापाला कळूनही तो रडत बसतो॥३॥
धीर सोडत नाही ती आई असते ,
चिखलात फुलत नाही ती जाई असते॥४॥
फुलपाखरू उडत-उडत जाई वर बसते,
त्यालाही येते आठवण त्याचिही ती आई असते॥५॥
आई म्हणजे मायेची सावली असते
जी खराब मूड मध्ये पण हसते...
