माझे बाळ
माझे बाळ
अनोळखा होता चेहरा तुझा
अनोळखी होता जिव तुझा
पण आपले हे नाते खुप कधिचे होते
आणि आपले हृदय एकच होते
शेवटचे दिवस जनु
एक दिर्घ काळ होता
एक एक दिवस ह्या लाॅकडाऊन पेक्षाही खुपच मोठा होता
तो रडका हसरा चेहरा तुझा स्वप्नातला
प्रत्येकक्षात समोर बघत होते
त्या माझ्या बाळाला समोर बघून
माझे सगळे जग जनु त्याच्या डोळ्यात वसले होते
पंख दिलेस तु जिवनास माझ्या
जिवनास नविन अर्थ दिलास
हृदयात एक नविन घर केलेस
मायेचे सुंदर दार उघडलेस
