STORYMIRROR

Seema Kulthe

Romance Tragedy

4  

Seema Kulthe

Romance Tragedy

वाट

वाट

1 min
386

खिडकी जवळ बसून तो एकटक बाहेर बघत बसायचा

ती परत नक्कीच येईन अशी ओढ धरुन बघायचा

गेली होती निघून ती रागाऊन त्याच्यावर

नेहमी सारखी त्याला माफ करेल अशा आशेने भाराऊन जायचा


दिवस निघून गेलेत, महिने निघून गेलीत

पण त्याची आस त्याला साथ देत राहिली


ती रोज सकाळी उठून त्याच्यासाठी गरम चहा करायची

नाश्तापण त्याच्याच आवडीचा बनवायची

त्याची सगळी सोय करता करता तीची सकाळ पळून जायची


सगळी काम आवरुन ती त्याची वाट बघत बसायची

जेवतांना रोज त्याला पहिला घास नक्कीच खाऊ घालायची


मी आपल्या खिडकीतून चोरून ही प्रेमलिला बघायची

अशी कशी ती सोडून गेली त्याला हि कोडं कशी उलगडायची


पण त्याला असे हताश बघुन डोळ्यात पाणी तरंगायचे

रहावले नाही म्हणून धाडस करून गेलेच मी एकदा

नक्की कोणाचे कुठे चुकले हे शोधायला पुसायला


कोसळून रडला तो, भाराऊनी गेले मी ही

फक्त एवढाच मला म्हणाला

वाहून टाकले होते तिने स्वःताला मजवरी

थोडा उशीरच झाला पण

तो मातीचा देव आता माणुस झाला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance