STORYMIRROR

Seema Kulthe

Others

3  

Seema Kulthe

Others

पंन्नाशी

पंन्नाशी

1 min
205

पंन्नाशी ग पंन्नाशी 

अशी कशी ग तु आलीस दारीशी


तारुण्याची चाहुल 

जणु कालचीच गोष्ट 

मातृत्वाची जाणिव 

जणु अत्ताचीच गोष्ट


अत्ताच कुठे मी मला सावरुनी

ऊश्वासाचा श्वास टाकुनी

थोडेसे हात नि पाय झटकूनी

जराशी विसाव्यात बसले होते


गुफिंत होते स्वप्ने भविष्याची

रंगवित होते पर्वे सुखाची

अचानक तुला दारी पाहुनि 

भंभावलि वेडी बावळी मी


आलिच आहेस हक्काने दारी

राहुनच जा सखी साजरी

धम्माल उडवु दोघी मिळुनी

साठीलाही गाठु हसु खेळुनी


पंन्नाशी ग पंन्नाशी 

आता अशीच रहा तु माझ्या पाशी



Rate this content
Log in