STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Romance Others

3  

Author Sangieta Devkar

Romance Others

माझा सखा

माझा सखा

1 min
273

सख्या जेव्हा तू येशील ना मला भेटायला,

त्या चंद्राला ही मी थांबवून ठेवेन.

बघ म्हणेन माझा चंद्र कीती आहे सुंदर!

लोकांना तुझ्यात त्यांच प्रेम म्हणे दिसत.

माझ प्रेम बघ माझ्या सख्याच्या डोळ्यात वसत.

बघ ना डोळ्यात त्याच्या दिसेल तुला ही,

सागराची गहाराई अन् नभाची निळाई.

काय पाहतात रे लोक तुझ्यात,?

तूझ्यावर तर डाग पण माझा सखा बघ बेदाग.

तू लपतो ढगाआड़ वाट पाहायला लावतो.

सखा माझा मात्र माझ्या आसपासच असतो.

का करू मी तुझ्या वर कविता का गाऊ तुझे गोडवे?

 माझ्या सख्या कड़चा एक तरी गुण आहे का तुझ्याकड़े?

  असा कसा हा चंद्र बघ कसा हिरमुसला.

  सख्या तुला पाहून तो ढगाआड़ लपला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance