माझा प्रियकर
माझा प्रियकर
हे निसर्गा करते मी तुझ याचना
तू माझा प्रियकर होशील का
बघुनी तुज होते हर्ष मला
तू जिवलग माझा होशील का
भेटण्यास तुला मी आल्यावर
तू फुलांचा वर्षाव करशील का
वेलीचा झोका बांधुनी त्या
झोक्यात मजला झुळवशिल का
विसावा तुझ कुशीत घेतांना
गवताचा गालिचा घालशील का
मी रानात थुई थुई नाचताना
तू पावसाने मला भिजवशिल का