माझा महाराष्ट्र देश
माझा महाराष्ट्र देश
माझा महाराष्ट्र देश
मजला जीव की प्राण
सर्व जगी भासे मज
तो सर्वाहूनी महान 1
नटलेला सह्याद्रीच्या
कुशी कडे कपारीत
राज्य हिंदवी स्थापिले
शिवबांनी याच भुमीत 2
संत वीर कलावंत
साहित्यिक यांची खाण
धन्य महाराष्ट् भूमी
काय वर्णू त्याची शान 3
इंदायणी गोदा, कृष्णा
भीमा, असती सरिता
भक्ती रसाची सदैव
जिथे वाहते कविता 4
करी वारकरी येथे
विठू नामाचा गजर
विसरुनी देहभान
विठू दर्शना हजर 5
स्वप्ने मनी रंगवूनी
जन सारे येथे येती
मिळवुन नाव , पैसा ,
भाग्य उजळुनी जाती 6