STORYMIRROR

Shobha Wagle

Inspirational

3  

Shobha Wagle

Inspirational

माझा कान्हा

माझा कान्हा

1 min
673

छकुल्या रे छकुल्या

दिसे तू माझा कान्हा

हास्य तुझे बघण्यास

झेपावते लाडक्या तान्हा....१


स्वर्ग सुख मज लाभे

तुझे खिदळणे पाहुनी

साजिरे गोजिरे रुप दिसे

मयूर पंख शिरी लावुनी.....२


पायी छुमछुम वाळे

दंडी दोन्ही बाजूबंद

पिवळे पिताबंर कटी

बासरी कटी पट्टीबंद.......३


रंग पंचमीस खेळायला

रंग रंगात रंगायला

कृष्ण कान्हा हा तयार

गोपी संग रंग उडवायला....४


तू माझा कृष्ण कान्हा

मी तुझी यशोदा माता

गोकुळातला सण होळी

पंचमी रंग खेळू या आता....५


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational