STORYMIRROR

Komal Patil

Romance Others

2  

Komal Patil

Romance Others

माझा होशील ना

माझा होशील ना

1 min
113

झाले मी तुझी बावरी

बघ ना रे एकदा तरी

होऊनी कृष्ण माझा तू

सहवास मला देशील ना?


आजन्म मी तुझी सखया रे

माझा होशील ना?

आतुरते मी तुला पाहण्या

झुरते रोज मी तुला ऐकण्या

होऊनी गीत माझे तू

साथ मला देशील ना?


आजन्म मी तुझी सखया रे

माझा होशील ना?

बघ पारिजात ही फुलला

आज माझ्या अंगणीचा

होऊनी ओंजळ माझी तू

फुले जपण्या येशील ना?


आजन्म मी तुझी सखया रे

माझा होशील ना?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance