STORYMIRROR

Shubhangi Mali

Tragedy Fantasy

3  

Shubhangi Mali

Tragedy Fantasy

माहेर

माहेर

1 min
194

उंच डोंगर पाही

पलिकडले माहेर

बघुनी त्याच्याकडे

स्वप्न सजता बाहेर....


विनवणी आहे माझी

वाहणाऱ्या वाऱ्याला

नेशिल कारे वाऱ्या

माझा निरोप माहेराला....


माहेराची माझ्या

लागते कधी ओढ़

काय बाई सांगू आता

किती लागे मज गोड....


वाट वळणी गावाची

व्यथा अशीही मनाची

दाटे काहुर मनात

नाव घेत माहेराची...


घास मिळे सोनियाचा

मला जरी सासरीला

सर येणार कधी त्या

माहेराच्या भाकरीला....


सासर अन माहेर

अक्षर सम तीन

अर्थ उमगला तिला

जी भोगे सासुरवाशीन...


झाल्या किती सांजा 

अन गेले किती दिन

वाट पाहे बंधुरायाची

मज माहेरी नेईन.....


बंधुराया माझा आला

अंगणी मोगरा फुलला

माहेरी जाण्यासाठी वाटे

जणू आनंद बहरला....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy