विसवलेल्या शाळा
विसवलेल्या शाळा
1 min
481
गिरवलेली अक्षर
अधीर होऊ लागली
काळाच्या ओघात
काहिशी पूसट वाटली....
शाळेच कौलारु छत
धुळीत सुस्तावली
बघे सोहळा रोजचा
नेत्रसुख निजावली....
हिरवळीचे पटांगन
कोरडे पडले अंगण
बहर नव्या क्षणांचा
करी देवा आलिंगन.....
झाडे हिरमुसली
पानगळ सुरु झाली
स्पर्श आवाज स्पंदने
नवस्वप्नात न्हाली.....
विसावलेल्या शाळा
खुनावती लडीवाळा
भरेल पुन्हा नव्याने
बालगोपाळांचा मेळा.....
