STORYMIRROR

Shubhangi Mali

Fantasy

3  

Shubhangi Mali

Fantasy

नवरंग विशेष -गुलाबी रंग

नवरंग विशेष -गुलाबी रंग

1 min
482

गुलाबी रंग,

फुलाचा, गालाचा

की उधळलेल्या 

गुलालाचा...


गुलाबी रंग,

ओठाचा अन काठाचा

की गोड गोजिऱ्या

हास्याचा....


गुलाबी रंग, 

हट्टाचा,थट्टेचा

की कणकणावर

विश्वासाचा....


गुलाबी रंग

वेलीचा,देठाचा

की उमलणाऱ्या

पाकळीचा....

गुलाबी रंग...

शेतीचा, मातीचा

की शेतकर्याच्या 

श्रमाचा.....


गुलाबी रंग 

प्रेमाचा प्रीतीचा

की राधे च्या

विरहाचा.....


गुलाबी रंग,

देहाचा, हृदयाचा

की अंतरातील

श्वासाचा.....


गुलाबी रंग

शब्दाचा,कवितेचा

की बहरलेल्या

मैफिलीचा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy