STORYMIRROR

Malati Shindikar

Inspirational

3  

Malati Shindikar

Inspirational

माहेर

माहेर

1 min
357

एक एक पाऊल पुढे टाकत टाकत रस्ता मी चालत होते. 

हिरवीगार वनराई पाहून 

मन माझे मोहीत होत होते. 

चालता चालता खडा टोचला

मी मात्र चालत होते. 

वनराईच्या धुंदीत मी मग्न होऊन जात होते. 

पानेफुले निसर्गाची किमया 

डोळ्यात साठवत मी पुढे पुढे जात होते. 

जाता जाता उन्हाचा चटका कधी जाणवू लागला कळलेच नाही. 

चालता चालता रस्ता संपला 

ओबडधोबड मार्ग दिसू लागला. 

आजूबाजूला न्याहाळत 

मी पुढे पुढे जात होते. 

निमुळती पायवाट 

आजूबाजूला शुकशुकाट 

ना झाडे ना सावली 

रस्ता तोच पायवाट तीच 

तरीघाबरल्यासारखे होत होते. 

सावलीचा शोध घेत पुढे पुढे जात होते. 

आणि एक नवलाई झाली 

सुंदर अशी एक रोपवाटिका नजरेस आली. 

टपोऱ्या फुलांची व फळांची रोपवाटिका पाहून मन आनंदाने प्रसन्न झाले. 

आणि नकळत माझे पाऊल तिकडे वळले व भरभर चालू लागले.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational