आयुष्य
आयुष्य
1 min
232
आयुष्याचा पतंग वरवर गेला
गिरकी खात खाली-वर झाला
मध्येच वर जाई मध्येच खाली जाई
वाऱ्याचा झोत वरवर नेई
वरवर जाता आकाश दिसे
भरारी मारणारे सवंगडी दिसे
खाली खाली येता धरणी दिसे
बघता बघता झटका बसे
धरणी दिसता घरकुल दिसे
घरकुलातील व्यक्ती दिसे
व्यक्ती व्यक्तीत चढाओढ दिसे
प्रेमाचा ओलावा कधीच न दिसे
कधीतरी केलेल्या मदतीचा सुगंध मात्र दरवळत असे
सुगंधाचा हा दोरा आठवणींना वरवर नेत असे
मध्येच आठवणींची गाठ जोरात पडत असे
गाठ मात्र सुटत नसे
पतंग मात्र गरगर फिरत असे
फिरता फिरता हिसका बसला
मंदिराच्या गच्चीवर अडकून पडला
असाच त्याचा शेवट झाला
