जीवन नौका
जीवन नौका
1 min
369
सगळीकडे काळे ढग
आकाश त्यांनी व्यापले.
पावसाच्या आशेने मी
त्याच्या कडे पाहिले.
त्याचा तो आर्दश
डोळ्यापुढे ठेवला.
आणि पावसाचा शुभारंभ झाला.
पावसाच्या पाण्याचे बुडबुडे मागे पुढे जात होते.
लहान मोठे एक एकमेकांना सांभाळून घेत होते.
बुडबुड्यांची होती रांग
एका मागून एक चालले
वळण येताच ते पाण्यात
फिरून आले.
फिरता फिरता एक झाले
त्याचे रूपांतर ओहळात झाले.
ओहळाच्या पाण्यात
कागदी होड्या विराजमान झाल्या.
नानाविध रंगाच्या होड्या
डौलाने मागे पुढे करीत सरकू लागल्या.
आणि एका क्षणात त्या पाण्यात मिसळून गेल्या.
अशीच आहे पतिपत्नीची जीवन नौका.
संसार सागरात मिसळून गेल्या.
