Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Manisha Wandhare

Romance

3  

Manisha Wandhare

Romance

लहर प्रेमाची...

लहर प्रेमाची...

1 min
196


पायात पैंजण वाजली ,

मन वेडावुनी मी धावली,

ही कोणती लहर प्रेमाची,

रोमरोमातुनी मनी वाहली...

मी हासली ,

मी लाजली ,

मी भान हरपुनी वेडावली...

मी प्रिया तुझी जाहली...

मी प्रिया तुझी जाहली...

डोळ्यातुन डोळ्यांशी कुजबूज कोणती झाली ,

तु बोलला ना काही तरी मी नाद तुझा , नादावली...

क्षण रंग भरीत प्रेमात या अंतरंगी रंगली ...

ऊडूनी गेलं मन पाखरू मी त्याच फांदी थांबली...

मी हासली ,

मी लाजली ,

मी भान हरपुनी वेडावली...

मी प्रिया तुझी जाहली...

मी प्रिया तुझी जाहली...

सुख प्रेमाची कळली,

शब्दावीण अबोल फुले पदरात बोलली,

तुने फुले प्रेमाची उधळली,

गोडवा पावसाच्या पाण्याचा ,

सुगंध मातीचा दोन्ही मिसळली ,

अशी चढली गुलाबी लाली,

मी प्रेमात हरवली ,

हरवुनी वाट मजला सापडली,

मी हासली ,

मी लाजली ,

मी भान हरपुनी वेडावली...

मी प्रिया तुझी जाहली...

मी प्रिया तुझी जाहली...



Rate this content
Log in