STORYMIRROR

Babarao Turale

Drama Others

3  

Babarao Turale

Drama Others

लग्नाची पोर

लग्नाची पोर

1 min
289

बाप म्हणते पोरीसाठी किती घेतले मी टोले...  

पोरग पायता पायता माह्या पायात आले गोळे... 

इतकं करून ईचि बहिन हिंडलो पोरगं नाही सापडे....

म्हटलं पोरीले मी आता थकल़ो

बाई करून टाक ऐखादे लफडे... 

आता किन‌ई जातीवाले ल‌ई खातात भाव...

घरी बसाले गेलो तर त्याच्या बाजीले नव्हता ठाव...

दुस-याच्या घरी लेकाचा फैलू फैलू बसते... 

आपल्या डोळ्यातल मुसळ दिसत नाही,दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसते... 

आपल्या घरी पोह्यात रहात तेल नाही... 

दुसऱ्याच्या घरी लेकाचा चुरपू चुरपू खाई... 

ह्या लेकाचा मसण्या उद, पोरगी गोरी गोरी पाह्येते...

आपण आहोत काळ्याकुट्ट, याचा विसर याला पडते...

बाप ह्याचा काळा कोळसा माय ह्याची गोरीपान...

माय सारखा झाला असता तर घरची वाढली असती शान... 

तुह्या बापानं असाच दुसऱ्याचा घेतला असन शाप...

म्हणुन तुह्या रूपाने तुह्या बाप भोगून राह्यलाय पाप... 

आता तरी हट्ट सोड जरा शहाण्यासारखे वाग...

असेच जर करत राहिला तर पिढ्यान पिढ्या तुह्या घरी जन्माले येईल डोम्या नाग... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama