कैद
कैद
लाॅकडाऊनमुळे माणूस घरात कैद झाला...
जणू काही त्याने खुप मोठा गुन्हा केला...
घराबाहेर त्याला पाऊल टाकता नाही येत ....
मृत्यूचे वादळ अवती भोवती घोऺघावत...
कोरोणाचा शिरकाव फक्त शहरामध्येच होता...
खेड्यापाड्यातही तो हातपाय फैलू लागला आता ...
सारे लोक कसे भीतीपोटी भयभीत झाले ...
कोरोणाचे भीतीपोटी कुणी अर्ध्यावर नेतानेताच मेले ...
मृत्यूचा जीकडे तीकडे तांडव आहे दिसत...
स्मशानातही प्रेत जाळण्यास जागा नाही मिळत ...
माणसांचा प्रवास आता कोणत्या दिशेने जात आहे...
अश्या परिस्थितीत प्रेताजवळचे पैसे, बांगड्या लोक काढून घेत आहे ...
काय म्हणाव माणसान उंचीचा शिखरच गाठला ...
माणसाचे मनातील मायेचा पाझर कसा आटला ....
देवाबाप्पा खुप झाले आता तरी धाव...
अवतार घेऊन माणसाचे जखमेवर मलम लाव ...
कुठे कुठे शोधू तूला फिरतो रानीवणी...
कोरोनाने केला मृत्यूचा तांडव सांगितो मी करूण कहाणी....
जर तू असाच पहात राहिला माणसांचे येले...
एक दिवस असा येईल कुणीही पुजणार नाही तुलें ...
म्हणुन विनंती करतो देवा तुला सांगतो करूण कहानी ...
तू असाच तमाशा पहात बसला तर तुला दिसणार नाही मानवप्राणी ...
