लाॅकडाऊन
लाॅकडाऊन
लाॅकडाऊनमुळे सारे लोक थंडगार झाले...
पाहवले जात नाही हाल साऱ्या जनतेचे मले...
गोरगरीब, धंदेवाले सारे एकमेकांकडे पाहू लागले...
हात जोडते देवाले असे कसे रे कठीण दिवस आले...
या हाताने कमावतो आणि दुसऱ्या हाताने खातो...
कसे होईल देवा जेव्हा लहान मुलगा जेवावे मागतो ...
काय सांगू त्याला बाळा काम धंदे बंद झाले...
असेच काढु दिवस थोडा धिर देत जा बाळा मनातले...
बरेच लोक अर्धपोटी उपाशी आहे ... नाही मिळत त्यांना जेवाले...
नियम पाळु सर्वजन हाकलून देऊ या कोरोनारूपी महामारीले...
नर्स डाक्टर,पुलिस कामगार आपल्यासाठी लढा देते...
आपण त्यांना मदत करू त्याकरिता पैसे थोडेच लागते...
काय झालं आपण त्यांना थोडसी दिली हिम्मत...
उत्साहाने काम करेल,त्यांचेअंगी येईल हत्तीसारखी ताकत...
डाॅक्टर,नर्स हळूहळू कोरोनारूपी राक्षसाला ठार करिल...
धीर सोडू नको बाळा पूर्वीसारखे दिवस आपोआप येईल...
लाॅकडाऊन उठताच आपण गोडधोड करून खाऊ...
पोटभर करू जेवण कुणीही उपाशी नाही राहू...
आपण सुखी तर देश सुखी जे होईल ते घेऊ पाहून...
अशी स्थिती निर्माण करू देशात कि होणार नाही कधी लाॅकडाऊन...
