लेक
लेक
लेक लाडकी बाहुली
बाई आनंदाचा झोका,
तिच मनाचा आरसा
बाई काळजाचा ठोका..//१//
आज जगतो नव्याने
बघा तिच्या हास्यापायी
माझ्या अबोला मनाला
वाचे क्षणातच बाई.. //२//
विरहाच्या डोहामध्ये
अश्रु ओंजळीत घेई
डोळा पुसे अलगद
म्हणे नको रडू आई..// ३.//
समजुन परिस्थिती
झुंज वास्तवाला देई
घरी मदतीला हात
अन् शाळेतही जाई..//४//
आम्ही दोघेही अडाणी
सांगे आम्हास कहाणी
नाही भरोसा जगात
स्वार्थी हेतूने वागणी .. //५//
सांगे अर्थ जीवनाचा
ओला सुकाच दुष्काळ
नको हिंमत हारु बा
येत राहतात काळ.. //६//