STORYMIRROR

Nitesh Kharole

Classics Inspirational Children

2  

Nitesh Kharole

Classics Inspirational Children

कविता दारुळ्या घरची दिवाळी

कविता दारुळ्या घरची दिवाळी

1 min
140

डोळी दुःखाश्रूची गोडी, उरी सुखाची पेटती होळी।

कशी रडून भुकेने गेली, सारी यंदाची रे दिवाळी।।


पेटता माझा दारोळ्या बाप,जाऊन विझला भट्टित।

नव्याने पेटून उठला, साऱ्या राग द्वेश्यांच्या शक्तित।।


प्रेम जिव्हाळाच्या बोलीत बाबाच्या,राग द्वेष तरंगले।

जीवापाड जपणारे हात त्याचे ते,मारण्यास आतुरले।।


इजतीचे फुटले फटाके, क्रोध धुळीत कपडे मडले।

वस्त्र धुतले अश्रूंनी, डोळ्यातून टिपूर पाणी सांडले।।


बाप न्हाहला दारूत, विसरुनी जिंदिगीचे भान सारे।

माय संसार शिवूनी, जोडतय जीवनाचे तुटलेले तारे।।


सारी दुनिया ही आझादित,गुलामीत माय आजही।

ती संसाराच्या बेळीत, कोणत्या गुन्हाची सजा ही।।


माय पौर्णिमातही अमावस्या, या दारुण काळी।

कधी सजली-धजली ना माय मायेची दिवाळी।।



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics