दोरोळ्या घरची दिवाळी
दोरोळ्या घरची दिवाळी
डोळी दुःखाश्रूची होडी, उरी सुखाची पेटती होळी।
कशी रडन भुकने गेली, सारी येदाची रे दिवाळी।।
पेटता माझा दारोळ्या बाप ,जाऊन विझला भट्टित।
नव्याने पेटून उठला, साऱ्या राग द्वेश्यांच्या शक्तित।।
प्रेम जिव्हाळाच्या बोलीत बाबाच्या ,राग द्वेष तरंगले।
जीवापाड जपणारे हात त्याचे ते,मारण्यास आतुरले।।
इजतीचे फुटले फटाके, क्रोधाच्या धुळीत मी मळले ।
वस्त्र धुतले अश्रूंवानी, डोळ्यातून टिपूर पाणी पडले।।
बाप न्हाहला दारूत, विसरुनी जिंदिगीचे भान सारे।
माय संसार शिवूनी, जोडतय जीवनाचे तुटलेले तारे।।
सारी दुनिया ही आझादित,गुलामीत माय आजही।
ती संसाराच्या बेडीत, कोणत्या गुन्हाची सजा ही।।
माय पौर्णिमातही अमावस्या, या दारुण काळी।
कधी सजली-धजली ना माय मायेची दिवाळी।।
