STORYMIRROR

Nitesh Kharole

Romance Classics Inspirational

3  

Nitesh Kharole

Romance Classics Inspirational

नात्यांची पतंग

नात्यांची पतंग

1 min
177

नकोय मजला तीळ गुळ 

नकोय दिखावाचा गोडवा

प्रेम वात्सल्य जिव्हाळाचा

नैवेद्य एकमेकांना भरावा ॥१॥


आयुष्याची इथे पतंग झाली

सुत आप्त परके सारे वाली

हात- साथ द्याव आधाराला

ठेवून ओढतांना हास्य गाली ॥२॥


बाळाने-आईशी नाळ जोडूनी

मिळवली नौमासाची शिदोरी

तसच पांगळी सुताविन पतंग

कायमचं राहील पडून अधुरी ॥३॥


पतंग सुतानी जीवापाड जपावं

न विसरता दोघे तोल सावरावं

वादळ वाऱ्यात न खचता उडावं

ऋणानुबंधाचे नांत सदा टिकावं ॥४॥


का? भार गोड बोलण्याचा

नेहमीच द्यावा तिळगुळाला

स्वभावातही असावा गोडवा

मग जग जिंकता येतं सर्वांला ॥५॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance