STORYMIRROR

Pandit Warade

Romance

3  

Pandit Warade

Romance

लावणी

लावणी

1 min
12.3K


लावणी

मंजूळ स्वरात कोकीळ गाते

कुsहूsकुsहूचा आलाप घेते

अंतरात प्रीती फूल उमलते

दवडू नका हो वेळ साजणा

उठा आळस झटकूनी

विनवते तुमची लाडकी राणी ।।धृ।।


नेसून शालू हिरवा भरजरी

घेते लाजेचा पदर झडकरी

हळूच जाते नजर तुम्हावरी

धडधड होतंय ऊरात माझ्या

बसा जवळ येऊनी

विनवते तुमची लाडकी राणी ।।१।।


नथ मोत्याची नाकात झुलते

बहर ज्वानीचा, काया खुलते

हिरेजडित डूल कानी डुलते

भाळी कसे कुंतल सळसळते

काळ्या नागिणीवाणी

विनवते तुमची लाडकी राणी ।।२।।


केसात माळला सुगंधी गजरा

मजकडे कशा बघा वळती नजरा

तुम्हीही मजकडे लक्ष द्या जरा

वाट पाहते नटून थटून मी

तुमची चातकावाणी

विनवते तुमची लाडकी राणी ।।३।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance