STORYMIRROR

jaya munde

Romance

3  

jaya munde

Romance

लावणी

लावणी

1 min
164

 नखरेल नारी मी बाई गोड खोबऱ्याची वडी,

 *मागं,मागं येऊन राया करू नका छेडाछेडी*....!!धृ!!


तुमच्या रूबाबानं मी हो किती भारावले,

तुम्हासंगतीनं पिरतीत चिंब भिजूनी गेले.

जीव ओवाळीला तुम्हावरी मी प्रेमवेडी,

*मागं,मागं येऊन राया करू नका छेडाछेडी*...!!१!!


  खट्याळ तुम्ही बाई मी भांबावून जाते,

छेडाछेडीत तुमच्या सारं हरवून‌ बसते.

पाहते मी तुमच्याकडे करूनी नजर वाकडी,

*मागं,मागं येऊन राया करू नका छेडाछेडी*..!!२!!


 अवतीभवती पाहती सारे हा आगाऊपणा,

कुजबुज कानी ऐकता प्रसंग जीवघेणा.

लांब व्हा तुम्ही बाई बरी नाही अशी खोडी,

*मागं येऊन राया करू नका छेडाछेडी*...!!३!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance