लावणी लेखन
लावणी लेखन
राया चला जाऊ बाजाराला
बुट्ट्याची पैठणी आणायला
मोर गुंफिलेली जरतारी
पैठणीच हवी नेसायला
पदरावरील नक्षी
जणू झाडांवर पक्षी
साधू मोका खरेदीचा
नेसण्या सणासुदीचा
जाऊ फिराया जत्रंला
सण पोरा बाळांचा
पाळण्यात बसायला
खाऊ शेवबत्ताशाला
करते हट्ट मी या रायाला
पैठणीच हवी नेसायाला

