STORYMIRROR

Jyoti gosavi

Romance Others

3  

Jyoti gosavi

Romance Others

लागला छंद प्रितीचा

लागला छंद प्रितीचा

1 min
366

कुण्या देशाची देखिली चंपाकळी

अनमोल चांदणी नवतीची नव्हाळी

अंगावर ल्याली शालू गर्भरेशमी

गालावरती गुलाब फुलती

अशी गुलाबाची ती कळी

मुसमुसलेल्या ज्वानीची हि नव यौवना

पाडूनी भुरळ गेली ती मना

तिची कांती सोनचाफ्याची

की तेजतर्रार नजरेची

 साडी अंजिरी रंगाची

आणि तंग चोळी पाचूची

नाकात लफ्फेदार नथ

चमकती मोतीयाचे दात

सोन्याची कंकणे सोन्याचा बाजूबंद

तिच्या स्पर्शाने मी झालो नजरबंद

केसात माळला होता मोगरा धुंद

पायात शिंदेशाही तोडे

पोटऱ्यांचे खांब ते उघडे

टचक टचक तो जोडव्यांचा आवाज

गळ्यामध्ये कोल्हापूरी साज

चालण्यात यौवनाचा ताठा

वेड लावीले साऱ्या हाटा 

असा हा वार इष्काचा

लागला छंदच पिरतिचा



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance