लाचारी
लाचारी
शक्तीच्या जोरावरती
बघतो अशी लाचारी
विसरुनी सारे वेड्या
करतो ही गुलामगिरी ||१||
पैसे ओढशी खोऱ्याने
वाढली श्रीमंती काही
ग्रासलो सारे व्याधीने
लाचारी झुकली नाही ||२||
ज्ञानीजन ते असती
अघाद त्यांची महती
टीका करती कायम
सारे विसरूनी जाती ||३||
विवंचना पैशाची
करे त्याला हतबल
गाडा ओढी संसाराचा
उडे मनाची धांदल ||४||
परिस्थितीचे वलय
निराशा करती मना
शक्तीच्या जोरावरती
लाचारी दावी वेदना ||५||