कवितेची वीण
कवितेची वीण
जशी प्रसूती वेदने
माय माऊली कन्हावी
तशी शब्दावरी प्रीती
अन कविता विणावी.
माझ्या बहीणाईचा घट्या
आपोआप पाडे पीठी
तसे कविता वीणाया
माझे शब्द येती ओठी.
सासुरवाशीण सुहासिनी
वाट माहेराची पाही
होई जिव कासाविस
अन कविता विणली जाई.
जशी विठ्ठल भेटीला
वाट पंढरीची जावी
तशी कविता विणाया
वारी शब्दपंढरीची व्हावी.
अशी कविता विणावी
रसिक मनाचा सोहळा
तुमच्या ओठावरी हास्य
धन्या होई शब्दवेडा
