वसंत बहरला
वसंत बहरला
आली वयामधी पोर
मनी दाटते काहुर
ओठ दांडींबाचा दाणा
सख्या भेटीची हुरहूर.
झाला तुळशी विवाह
आबा घाई तुम्ही करा
शोधून राजबींडा कुणी
दारी मांडव ऊभारा.
तरण्या लेकीच हे मन
माय मनान जाणल
दीला ऊंबराचा धाक
मना वारुले बांधल.
आली सजनाची स्वारी
भेटीगाठी खूप झाल्या
हळदीच्या ग वेळेला
सख्या साजणी जमल्या.
समवयी सखी संगे
मन रीतं माझं झालं
रती-कामदेवाच मागण
सहजच ओठी आल.
आज पहीलीच रात
मी नटले-सजले
मना मधी लई भीती
रोमरोमात थिजले.
सजनाच्या मीठीमंध्ये
देहभान हरपल
आयुष्यभर जपलेल
हसत अर्पण मी केल.
कळी कुंदाची फुलली
आंबा टच्च मोहरला
नवचैतन्य लेवून
स्त्रीचा वसंत बहरला.
सचिन पाटील
९६५७३७८७७६

