STORYMIRROR

वर्षा अरगडे

Classics

4  

वर्षा अरगडे

Classics

कविता

कविता

1 min
330

कवितेची कल्पना

कधीही येऊन धडकते

काळ, वेळ, कर्तव्यात

ती न कधी अडकते

आल्यावर मात्र

स्वस्थ ती न मुळी बसू देत

नवनिर्मितीच्या आगमनाच्या

प्रसूती वेदना मला भेट

तिच्या पुर्ण आगमनानंतर

मन थकून शांत होत

रंग, रूप, आशयावरून

तिच छान बारस होतं

ताल, लय, भावना

ह्यानी तिला सजवलं जातं

पेनाची दोरी असलेल्या

पुस्तकाच्या पाळण्यात

तिला अलगद जोजावल जातं

कल्पनारूपी बीजातून

अशा प्रतिभावान कवितेचं

आगमन होतं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics