STORYMIRROR

Deepali Aradhye

Tragedy

3  

Deepali Aradhye

Tragedy

कविता - पसारा

कविता - पसारा

1 min
196

मग मी आवरू लागते पसारा, अचानकच

भावनांचा आणि सोबत विचारांचा ही


खरंतर ताळमेळ नसतोच त्यांचाही

तरीही वाट धरलेली असते सोबतीची

पण हा आहे एक कुटील डाव,

एकाच वेळी साधला गेलेला,


विचारांचा भावनेसोबत ठरलेला,

वाट अडवून ठेवण्याचा,

डोळ्यात साठलेल्या अश्रूंचा,

कारण अनावर बांध त्या अश्रूंचा,


झेपणार नसतोच झेलायला आणि

थांबवायला तसेच अडवायला सुद्धा,

मग मी आवरू लागते पसारा, आता

मात्र अत्यंत पराकाष्ठेने, गरज म्हणून!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy