भाव मनीचे
भाव मनीचे
1 min
238
भिजलेले मन माझे, पावसाच्या सरीने
तुझ्या भेटीसाठी आसुसलेले, चातकापरीने
भावतरंग माझ्या हृदयीचे, सप्तसुरांच्या चालीचे
नकळत उमटत गेले, गुज माझ्या मानसीचे
दूर उभा तू, अन अंतर हे पराकोटीचे
इच्छा माझी दुबळी जरी, प्रेम माझे खरोखरीचे
गाज तुला घालताना, घाव मी सोसले बरे
दुःख नाही पण समाधान माझ्या मनीचे
