धागा
धागा
1 min
120
एक धागा तुटताना,
एक धागा जुळूनी गेला,
अवघाची रंग एक होताना,
थोडे दु:ख देऊनी गेला,
ऋणानुबंधाचा होईल की,
मर्मबंधातली ठेव असेल,
येणारा काल तो निर्णय घेईल,
आज तो धागा मात्र निमित्त साधेल,
रेशमाच्या मऊ स्पर्शाची सुंदर आठवण सांधेल!