ठिणगी
ठिणगी
1 min
212
मी शोधात आहे ठिणगीच्या
माझ्या आत दडलेल्या की
मग शोधू कुठे इतर ठिकाणी
बालकाच्या हास्यात, वाचनात
लिखाणात, पतीच्या यशात
की अजूनही असतील जागा
जिथे सापडेल ही ठिणगी
आणि म्हणेल की मी आहे
इथेच.. तुझ्या स्वागताला उभी
कारण गरज तुला नव्हे आहे मला
मी तयार आणि आतुर आहेच
कोणत्यातरी पसरलेल्या पदरात
हलकेच आपले दान टाकायला
बाई! अशी दिवास्वप्ने पाहू नकोस
ऊठ! आणि एक छोटी लढाई लढ
फक्त एक हाक दे, ठिणगी मी खेळले
माझा डाव, मी लढले माझी लढाई
आता तू अस किंवा ये किंवा जा!
निर्णय तुझा आहे कारण हार-जीतपेक्षा
लढण्यातला आनंद आणि जोश उमगला
तीच ठिणगी आहे, हा समज ही आला
तीच ठिणगी, तीच संधी भाव हा समजला!
