कविता - प्रथम भेट
कविता - प्रथम भेट
तूला आठवेल का आता
ती आपली प्रथम भेट
दिवाळीच्या वेळीच तर
खेटली होतीस तू थेट।।
मी फोड़त असताना
फटाके आठवते का तूला
तू घाबरून अचानक
बिलगली होती मला।।
फटाक्यांचा हा आवाज
असाच रहावा वाजत
असे वाटत असतानाच
तू झाली दूर लाजत।।
तू सॉरी म्हणून मला
चालती झाली तेथून
नकळत तूला थैंक्यू म्हणून
यावे म्हणून आलो परतून।।
मी थैंक्यू म्हणण्याआधीच
तू मजशी लगेच वदली
फटाक्यांच्या भीतीनेच
ती तेव्हाची घटना घडली ।।
अश्या घटना वारंवार
हव्यात जीवनात घडायला
तुझ्यासारखे कोणीतरी असे
गळ्यात हवे पडायला।।
मी न चुकता दरवर्षी आता
दिवाळीत फटाके फोडतो
तुझी भेट कधी तरी होईल
याची चातकासारखी वाट बघतो।।
आता तर फटाके फोडायला
केली आहे कोर्टाने मनाई
ती ची भेट च नाही होणार
तर कशी काय वाजणार शहनाई।।