कुठं कुठं पाहू
कुठं कुठं पाहू


कुठं कुठं पाहू.....
इथं नाही तिथं नाही कुठं गेली सांग
कुठवर येवू असा आता तुझ्या मागं
शोधुनिया थकलो मी आता कुठं जावू
कुठं कुठं पाहू तुला कुठं कुठं पाहू.
लागली सवय मज होतो तुझा भास
हवा हवासा वाटतो तुझा सहवास
तुझ्याविना सुने सारे आता कसा राहू
कुठं कुठं पाहू तुला कुठं कुठं पाहू.
भूक तुझ्या प्रेमाची ही मला लागलेली
आठवणी मध्ये तुझ्या रात जागलेली
शोध घेत घेत आता चांदण्यात जावू
कुठं कुठं पाहू तुला कुठं कुठं पाहू.
पुन्हा कधी भेटशील सांग ना गं मला
फुलापरी जपून मी ठेवणार तुला
मिळूनिया जीवनाचे गीत दोघे गाऊ
कुठं कुठं पाहू तुला कुठं कुठं पाहू.