कुंटूब
कुंटूब
सोनेरी पहाट होता
सडा रांगोळी घालते
जाई जुई मोगरा ग
माझ्या अंगणी फुलते...!!१!!
माया ममतेनं भरलेलं
नात्यान गजबजलेलं
विश्वासाचं ओतप्रोत
माझ कुटूंब सजलेलं ..!!२!!
माझ्या घराचा वारसा
सासुसासरे दिर जावा
साऱ्यांनाच वाटतो ग
माझ्या संसाराचा हेवा..!!३!!
धनी माझा कुंकवाचा
कुटुंबाचा तो आधार
दिनरात कष्ट करुनी
करे सपन साकार...!!४!!
सुख दुःखाच्या छायेत
आनंदाने राहतात
छोट्याशा या झोपडीत
सुख समृद्धिने नादतात.!!५!!
प्रेम विश्वासाने उभ्या
माझ्या घराच्या भिंती
एका माळेत गुभंलेले
आम्हीं सारे मनिकमोती!!६!!
