STORYMIRROR

Sanjana Kamat

Inspirational

3.7  

Sanjana Kamat

Inspirational

क्षणभर विश्रांती

क्षणभर विश्रांती

1 min
220


आई रिटायर कधीच होत नाही

साऱ्या प्रपंचाची दोरी ओढतच राही

क्षणभर विश्रांती ठावूकच नाही

ती मशीन की माणूस हे कळेल का? काही


सोळाव्या वयात संसार सुरू झाला

दोन नणंदा, दिर, पाच, सहा, सात वर्षाचे तेव्हा

सासरा भ्रमिष्टाने घरात फिरे सदा

लाडाची लेक डोळे भरून पाहे तेव्हा


आली जावूबाई तोऱ्यात, केला संसार वेगळा

माहेरचीच नाते जपण्याचा घाट तो सगळा

आईने नवऱ्याच्या इच्छा पूर्तीत जीव गुंतीला

गणगोतास मदतीचा हात देत होते सकळा


सुनबाई बसली, पीएचडी घेत

दिवाळीत धन्यास विजेचा झटका

मुलीला कर्करोगाचा दिलास चटका

मित्रांच्या नादात लेकाने काढला लचका


थकले शरीर लटपट स्वैपाक करत राही

क्षणभर विश्रांती देण्यास विसरलास काही

अजून सत्व परीक्षा तिची काही सरतच नाही

सत्व आहे त्यांचीच परीक्षा देव घेतच राही


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational