STORYMIRROR

Pandit Warade

Classics

3  

Pandit Warade

Classics

कशाला धावतो आहे

कशाला धावतो आहे

1 min
363

*लगावली:-लगागागा, लगागागा*


कशाला धावतो आहे

मनाला मारतो आहे


नसावी खंत थोडीही

व्यथा सांभाळतो आहे


रिकामे जायचे अंती

धनाला ओढतो आहे


स्मशानी शांतता मोठी

तयाला टाळतो आहे


खुशी जीवास लाभावी

अहमला पोसतो आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics