कस जमत रे तुला..
कस जमत रे तुला..


सोबत नसताना ही माझ्या चेहऱ्यावर हासु देवून जातोस,
कस जमते रे तुला नकळत असा तुझा भास देवून जातोस.
कधी मायेची ऊब बनून तर कधी रागवून समजुत घालनारा,
कसे जमते रे तुला दूर असूनही माझा भक्कम आधार बनायला.!!!
प्रत्येक क्षणात तू सामावलेला,जसा माझ्यात विसावलेला,
डोळ्यातुन वाहणाऱ्या अश्रुना आपल्या ओठांनी टिपनारा.
मी आहे कायम सोबत तुझ्या नको काळजी करूस,
नुसत बोलण्यातुन मला तू कस काय नेहमी सावरतोस?
मी काही नाही बोलले तरी ,सगळच कस रे तुला समजत,
किती ही मी उदास असो नुसत डोळ्यानी तुझ्या मला हसवतोस!!!
पुन्हा पुन्हा तुझ्या प्रेमात मी पड़ते कस कोण रे इतक चांगला असु शकत?
तुला पाहुन अस वाटत की खरच या पेक्षा प्रेम वेगळ काय असत?