कर्माची फळ
कर्माची फळ
अस म्हणतात कर्माची फळ
आज ना उद्या नक्की मिळतात
पण चांगल्या कर्माची फळे
तरी कुठे चांगली मिळतात
चांगल्या कर्माला ही कधी-कधी
अग्नी परीक्षा द्यावी लागते
केलेले कर्म चांगले आहे याचे
प्रमाण इतरांकडून घ्यावे लागते
हेतू पुरस्सर चांगल्या हेतूकडे
जाणून दुर्लक्ष केल्या जाते
अविश्वासाच्या ठरावाचे
रोज गोडवे गायले जाते
चांगल्या-वाईट कर्माचे फळ
कोण म्हणतं सहज मिळतं
प्रत्येकाच्या दृष्टीतील अपेक्षांच्या
विळख्यात कर्मफळ ही गिळतं
चांगुलपणाने कितीदा तरी
तुसडेपणाची हद्द अकर्भमवली
विचारांची मांदियाळी फक्त
चांगल्या आशेवरच विसावली
